बॉलीवूडमधले फेमस लव बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरचं विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून आतुरता आहे. अशातच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो लग्नाबद्दल बोलताना दिसला आहे. यात रणबीरने एका महिला पत्रकाराला माझ्या लग्न करशील असा प्रश्न विचारला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणबीर कपूर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. यावेळी महिला पत्रकाराने त्याला विचारलं, “या कपड्यांमध्ये तू परफेक्ट नवरदेव असल्यासारखा दिसत आहे. पण तू लग्न कधी करणार? यावर रणबीर कपूर विनोदी पद्धतीनं रिपोर्टरला म्हटला की, तुझं लग्न झालयं का. तू माझ्याशी लग्न करशील का मी करेन. रणबीरनं विनोदी प्रतिक्रियेमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ झूम टिव्हीने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून चाहत्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
सध्या रणबीर कपूर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमात काम करताना दिसणार आहे.यामध्ये तो गर्लफ्रेंड आलिया भट सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रणबीर-आलिया प्रथमच एकत्र काम करणार आहेत. याशिवाय रणबीर शमशेरा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.