प्रियकरासोबत पत्नी फरार त्यानंतर तिच्या विरहात पतीने घेतला हा निर्णय !

69


एक महिलेने आपल्या पोटच्या २ पोरांना व पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर पत्नीच्या अचानक सोडून जाण्याच दुःख सहन न झाल्याने पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नैराश्यात टोकाचे पॉल उचलणाऱ्या पतीचं समुपदेशन करत त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तसेच दोघा पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहावे असा सल्लादेखील पोलिसांनी दिला आहे. योग्यवेळी पोलीस योग्य वेळी पोहोचल्यामुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार हि महिला रांजणगाव येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पळून जाताना तिने आपल्या साडे चार वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या दोन मुलांना आपल्या पतीकडेचं सोडले होते. पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याने तिचा पती नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने आपली पत्नी आपल्याला सोडून गेली याचा धक्का सहन न झाल्याने काल त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.


हा तरुण आत्महत्या करणार आहे असे समजताच वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पीडित पतीची समजूत काढून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यावर ती महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली होती त्याने देखील तिला सोडले होते. यानंतर ती रांजणगावात एक स्वतंत्र खोली घेऊन राहात होती. या महिलेनेदेखील प्रियकराने सोडून दिल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील पोलिसांनी तिची समजूत घालून तिला आत्महत्या करण्यापासून अडवले होते. यानंतर पोलिसांनी या दोघांची समजूत काढून त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला.