अजित पवारांच्या पुढाकाराने २३ गावे पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट होणार ?

87

जानेवारी महिन्यात पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा 15 दिवसांत होण्याची शक्‍यता आहे.

पुणे महापालिकेच्या लगतची 34 गावांना महापालिकेत सामाविष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहेत. पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाला असून, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही गावे महापालिकेत घेण्याबाबत पुढाकार घेतला आहे.

त्या गावांचा समावेश करण्याबाबतचा अभिप्राय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर लगेचच ही गावे समाविष्ट होतील, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार प्रस्ताव मंजूर करून पुढील महिन्यांत निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे.