या नियमांसोबत स‍ामान्यांसाठी सुरु होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा

7

लॉकडाऊनमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा काहीकाळ बंद होती. अनलॉकदरम्यान परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच लोकलची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे य‍ांनी सांगीतले आहे. नुकतीच याबाबतीत ऊद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवास्थानावर बैठक झाली. यामध्ये वरिष्ठ रेल्वे अधिकारीदेखील ऊपस्थित होते.

 गर्दी होणार नाही अशा विशिष्ट वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच सामान्य प्रवाश्यांची होणारी गैरसोयही टळेल.

   सर्वसामान्य  प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून ते दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून ते  शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

   सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत सामान्य प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासीच प्रवास करू शकतील. या नियमांसोबत आपण लोकल रेल्वेची सेवा सुरु केल्यास आपल्याला गर्दी टाळता येणार आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग वाढण्यास प्रतिबंध येईल. 

 सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंतीदेखील मुख्य सचिव यांच्या प्रसिद्धी पत्रकातून यावेळी करण्यात आली आहे.