मुंबई येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर ११ मार्च रोजी अंदोलनाचे राज्यभर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
सदरील मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थीत गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत याबद्दल चर्चा केली.
विद्यार्थीना भविष्यात अडचणीत येऊ नये हि अपेक्षा व्यक्त केल्यानंतर जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी तातडीने गुन्हे मागे घेऊ, विद्यार्थी चे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिल्याचं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. यावेळी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष माजी खा. आनंद परांजपे उपस्थीत होते.