शिवसेना आणि पर्यायने महाविकासआघाडी सरकारच्या अडचणींत आता अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आणि शिवससेनेचे आ.संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. त्यावरुन विरोधातील भाजपने शिवसेनेला चांगोेच धारेवर धरले आहे. मात्र आता राठोड याांच्यानंतर संजय राऊतांवरसुद्धा एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. तसेच महिलेने मुंबई ऊच्च न्यायालयात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी(दि.२६ फेबृ) तक्रारसुद्धा दाखल केली आहे.
मुंबईतील अॅड. आभा सींह असे या तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. संजय राऊत हे माझी सतत छळवणुक करीत असतात. माझ्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, एवढेच नव्हे तर त्यांनी माझा विनयभंगसुद्धा केला आहे. असे या महिलेने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. न्या. मनिष पितळे व न्या. संभाजी शिंदे यांच्या खंडपिठापुढे हा अर्ज करण्यात आला आहे. यावरील पुढील सुनावनी ४ मार्चला असणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने यासंबद्धीचे वृत्त दिले आहे.
२०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर माझ्यावर दोन अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये माझ्या कारवर हल्ला झाला होता. यासंबंद्धि मी
माहिम पोलिस स्टेशन आणि वाकोला पोलिस स्टेशन याठिकाणी तक्रार नोदवली होती. मात्र पोलिसांकडून यावर कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
गेल्या सात वर्षापासून माझी छळवणुक सुरु आहे. गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना पत्रे लिहून न्याय मागितला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. राष्ट्रीय महिला आयोगातसुद्धा धाव घेतली. त्यावेळी एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र अद्याप त्यावर कुठलिही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी आता ऊच्च न्यायालयात न्याय मागते आहे. असे या महिलेने म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत यांचेकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.