वरळी ‌मटका व जुगार मुळे डोणगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

91

मेहकर प्रतिनिधी – विष्णु आखरे पाटील

डोणगांव परिसर व अकोला आणि वाशीम जिल्हातील शेकडो लोक वरळीचे आकडे लावण्यासाठी येतात. मात्र त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क, संचार बंदी यासारखे कोणतेच कोरोना प्रतिबंधित नियम पाळल्या जात नाहीत. ते नियम फक्त वैध व्यावसायिकांसाठीच आहेत का असा प्रश्न जनतेत निर्माण होतो.

एकीकडे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी कोरोना प्रादुर्भाव रोख थांबसाठी विविध निर्बंध सुरू केले. यात पाच पेक्षा जास्त लोक एका जागी न जमणे, तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने चालतील त्या नंतर सर्व बंद, साप्ताहिक बाजार बंद असे कित्येक निर्बंध लावलेले आहेत. मात्र डोणगांव, घाटबोरी, विश्वी, लोणी गवळी, बेलगांव, अंजनी बु,शेलगाव देशमुख,आरेगाव गावात सध्या वरली मटक्याचे दुकान थाटलेली आहेत. या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने जे नियम लावलेले आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही.

का लहानशा खोलीत २० ते २५ लोक जमतात तर डोणगांव येथे कॅरम बोर्ड, भाजी मंडीच्या पाठीमागे, बैल बाजारात,शेलगाव देशमुख येथे बस स्टॅण्ड वर अश्या कित्येक ठिकाणी राजरोसपणे वरली मटका सुरू आहे, तेव्हा याने कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो.

एकीकडे गर्दी होऊ नये म्हणून आठवडी बाजार बंद आहे मात्र, या ठिकाणी नियमित गर्दी पाहायला मिळते. तर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार ५ वाजता नंतर मेडिकल व दुध डेअरी वगळता सर्व आस्थापना बंद राहतील असे आदेश असताना सुद्धा जुगाराच्या दुकानांत ५ वाजून १५ मिनिटाला मिलन क्लोज येतो तर ६ वाजून १५ मिनिटाला कल्याणचा आकडा येतो. त्यानंतर मिलन नाईट ओपन ९ वाजून १५ मिनिटाला येतो अखेर रात्री ११ वाजून १५ मिनिटाला अक्खर मिलन नाईट येतो. यासाठी जुगार घेणारे बसलेले असतात तेव्हा त्यांना संचार बंदीचे नियम लागू होत नाहीत का असा प्रश्न वैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या मनात निर्माण होत आहे.

महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन जुगाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही,सर्वांच्या तोंडाला मास्क, सॅनेटाइजर या सूचना द्यायला हव्यात ज्याने कोरोनाचा फैलाव होणार नाही व अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट सुद्धा करायला हवी ज्याने कोरोनाचा फैलाव होणार नाही.