महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यावरून आता शिवसेना-भाजपा यांच्यात हल्लाबोल सुरू आहे.
सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं पण शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला होता. याचं टिकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे.
“आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवाळाची चिंता करा”, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.