चिंताजनक ! : औरंगाबादमध्ये युकरमायकोसिसचे ‘इतके’ बळी

29

जागतिक कोरोना संकट सुरू असतानाच म्युकरमायकोसिस नावाचा नवा आजार समोर उभा ठाकला आहे. करोनामधून सुटले तरी रुग्ण या रोगाचे शिकार होत आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसने १६ रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे.

शहरात दीड महिन्यात या आजाराचे २०१ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांना मोठी चिंता सतावत आहे.

ज्यांना करोनाचा जास्त त्रास झाला त्यांना आता म्युकरमायकोसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची माहिती मागविली आहे. त्यानुसार शहरातील सहा रुग्णालयांनी माहिती पाठवली आहे.