मागील बारा-तेरा महिन्यापासून या परभणी जिल्ह्यातील कुस्ती स्पर्धा पूर्णतः थांबल्या आहेत. परिणामी, पैलवान आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने या स्थितीत कुस्ती स्पर्धांना परवानगी बहाल करावी, पैलवानांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पैलवानांच्या एका शिष्ट मंडळाने केली.
शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना जगदंब प्रतिष्ठाणच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. त्यात जिल्हयातील यात्रा, उत्सवातून आयोजित करण्यात येणार्या कुस्त्यांच्या स्पर्धा थांबल्या आहेत. पैलवानांवर मोठ्या प्रमाणात संकटात आहेत.
कोरोनाच्या संकटाने गेल्या वर्षभरापासुन कुस्ती मैदान आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी पैलवान आर्थिक संकटात सापडले आहेत. खुराक आणि उदरनिवार्हासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालुन पैलवानांना मदत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शहरात काही मोजक्याच तालमी अस्तित्वात आहेत. तेथेही सराव करणार्या पैलवानांची संख्या मोजकीच आहे. पैलवान होणे आत्ता सोपे राहिलेले नाही. आज खुराकाचा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला आहे. महागाई वाढल्याने अनेकांनी कुस्ती खेळणे बंद केले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर खासदार संजय जाधव, जगदंब प्रतिष्ठाणचे पैलवान अमोल कदम, पैलवान अमोल मोरे, आदींच्या स्वाक्षरी आहेत.