कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीयअर्थव्यवस्था प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षातील जीडीपी नुकतीच जाहीर केला आहे .
पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना चुकीची असल्याचं सांगत हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता, असा टोला काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
गेल्या चार दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.