सनी देओल यांना Y दर्जाची सुरक्षा; पण कशासाठी ?

41

सनी देओल यांनी नव्या कृषी कायद्यावर केंद्र सरकारच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्यांना धमक्या मिळाल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर भाजपा खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. 

भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी गेल्या 6 डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली होती.हा शेतकरी आणि सरकारमधील मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु नये,’असे ट्विट सनी देओल यांनी केले होते.

मात्र लोकांना ही प्रतिक्रिया पचनी पडली नव्हती. अनेकांनी सनी देओल यांना दुटप्पी, डिप्लोमॅटिक म्हटले होते. एका युजरने ‘शेतकरी आपली लढाई स्वत: लढेल पाजी, कदाचित तुमच्या हाडांमध्ये पाणी भरलेय,’ अशी कमेंट केली होती.सनीजी अब बोले, चलो कुछ तो बोले, असे म्हणत एका युजरने सनी देओल यांना डिवचले होते. आयबीच्या रिपोर्टच्या आधारावर काल त्यांना वाय सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या सुरक्षेअंतर्गत सनी यांच्यासोबत आता 11 जवान आणि 2 कमांडो सतत राहतील.