दिल्ली येथील आरएमएल रूग्णालयाजवळील निवासस्थानी हिमाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आज होणारी भाजपच्या संसदीय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.
त्यांनी भाजप मंडी जिल्हा सचिव, भाजप हिमाचल प्रदेश सचिव आदी पदांवर त्यांनी काम केले होते. हिमाचल फूड एंड सिविल सप्लाई कॉरपोरेशनचे ते अध्यक्ष होते. 2014च्या निवडणूक काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा सिंह यांचा त्यांनी 40 हजार मतांनी पराभव केला होता.
हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली. त्यात सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डेलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खासदार रामस्वरूप शर्मा हे काही दिवसापासून आजारी होते.