“राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होत आहेत. मतदारसंघातील प्रश्नांची उकल होत आहे. कार्यकारिणीतील अडथळे समजून घेत लवकरच या समस्यांवर मात करण्यासाठी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुमसर-मोहाडी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नेहमी भेटणं होत नाही. अशा सर्व कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यासाठी हा दौरा काढण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या दौऱ्याची घोषणा केली आणि विरोधकांचे कान टवकारले. मात्र आमचा हा दौरा संघटनेला बळकटी देण्यासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.