‘या’ प्रसिद्ध गायिकेने केला अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

55

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची संस्कृतीक विंग मजबूत झाली आहे.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

वैशाली माडे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.