यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अनरावती विभागाचे आयुक्त पियुष सिंह यांना पत्र लिहीले आहे. प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी कोरोनाच्या संकटकाळात सहकार्य करत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकार्यांनी पाठवलेल्या या पत्रामुळे यवतमाळ प्रशासनात खळबळ ऊडाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी ई. अधिकारी कोरोनाकाळात योग्य सहकार्य करत नसल्याचे एम. देवेंद्र सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच यवतमाळ येथील प्रशासकीय कामकाज अनधिस्त आहे. येथील कारभारावर कुणाचेही नियंत्रन नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरचित्रसंवादाद्वारे संवाद साधून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासंर्भातील ऊपाययोजना सुचवल्या होत्या. यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसींग, दैनंदिन आढावा बैठका यांचा समावेश होता. मात्र कुठल्याही बाबतीत अधिकारी सहकार्य करत नसल्याचा ऊल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. तसेच संचारबंदीत दंडात्मक कारवाई, प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिरिक्त पोलिस दल या सगळ्यांकडे पोलिस अधिक्षकांचे दुर्लक्ष आहे. असेसुद्धा त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान यवतमाळमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकार्यांचे आयुक्तांना अशाप्रकारे पत्र पाठवल्याने यवतमाळकरांत चिंतेचे वातवरण आहे. तसेच प्रशासनात खळबळ ऊडाली आहे.