शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेतला आहे. “राज्यपालांनी अशा प्रकारे १२ सदस्यांची नियुक्त न करणं हा घटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून थेट राज्यपालांनाच जाब विचारल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून देखील राज्यपालांना लक्ष्य केलं जात आहे.
Tauktae चक्रीवादळामध्ये बॉम्बे हायजवळ अफकॉनच्या बार्ज पी-३०५ ला झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठ्या संख्येने जीवितहानी झाली आहे. या मुद्द्यावरून संजय राऊतांनी ओएनजीसीवर ताशेरे ओढले आहेत.
तसेच आपल्या १२ सदस्यांना नियुक्त करणं हे २ मिनिटांचं काम आहे. तुम्ही किती वेळापर्यंत फाईलवर बसून राहणार, हा प्रश्न जर उच्च न्यायालय विचारत आहे, तर आम्हीही तसा प्रश्न विचारू”, असंही राऊत यावेळी म्हणाले.