महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूनं आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.
राज्य सरकार आणि भाजपा नेते आमने-सामने आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकाही केली. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
या तिघाडी सरकारने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. स्वतः काही करायचे नाही. भाजपा जनतेचा पक्ष म्हणून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्रातील जनतेसाठी आणणार, याचा राग म्हणून की काय राजकीय आकसाने आज हे कृत्य करून तुम्ही चुकलात.. याची किंमत मोजावी लागणार!,” असं लाड यांनी म्हटलं आहे.