देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौरा केल्यावरून राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
त्यावरून तुमचे पाय हे तुमचे सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत. ते जमिनीवर राहणं याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आनंद आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
विरोधी पक्षनेत्याचे पद हे मुख्यमंत्र्यांच्या समान पातळीवरचे मानले जाते. दोघांनी ठाणे, पालघर जिल्हयातल्या कोळी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले. असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राबाबत दुजाभाव केल्याची टीका केली जात आहे, त्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, या सगळ्या अर्थाने वावड्या आणि अनावश्यक चर्चा असतात. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.