कृषी कायद्याविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक; दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

10

दिल्लीतल्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा बारावा दिवस, अजूनही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक आक्रमक होताना पाहायला मिळतय. या शेतकरी आंदोलनाला अनेक पक्ष, संघटना आणि चित्रपट कलाकारांकडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. आता या कृषी कायद्याविरोधात औरंगाबाद येथील युवक काँग्रेस मैदानात उतरले आहे.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं निदर्शनं केली. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसनं क्रांती चौक औरंगाबाद याठिकाणी घोषणाबाजी केली. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 

केंद्र सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु राहील, असा इशारा युवक काँग्रेसनं दिला आहे. जोपर्यंत कायदे रद्द केले जाणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळेल, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला.