झेडपीचा मास्तर जगात भारी, डिसले मास्तरची लाजवाब कामगिरी

52

युनेस्को आणि वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल शिक्षक पुरस्कार यंदा मराठमोळ्या झेडपी शिक्षकाला मिळाला आहे. सोलापुरातील परतवाडी शाळेचे शिक्षक रंजीतसिंह डिसले यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्काराची घोषणा केली. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमात ही अधिकृत घोषणा झाली. रंजीतसिंह हे पहिले भारतीय ग्लोबल शिक्षक पुरस्कारार्थी ठरले आहेत.

140 देशातील बारा हजारांपेक्षा अधिक शिक्षकांमधून रणजीतसिंह यांची निवड झाली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कौतुकाचा विषय म्हणजे ग्लोबल टिचर्स आवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह यांनी पुरस्कार म्हणून मिळणाऱ्या 7 कोटी रक्कमेतुन 50% म्हणजे तब्बल साडेतीन कोटी रुपये त्या स्पर्धेतील इतर देशातील विशेष कामगिरी करणाऱ्या उपविजेत्या शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतला आहे आणि उर्वरित रक्कम असेच शिक्षण विकासाच्या कामाला लावणार आहेत.