फ्लिपकार्टला झटका: अत्यावश्यकच्या नावाखाली विकत होते इतर उत्पादके

353

अॅड सूरज चकोर यांनी पाठवली होती नोटिस व फ्लिपकर्टने घेतली माघार.

कोरोनाच्या संकटामुळे देशाचा विशेषतः महाराष्ट्राचा खूप मोठा नुकसान झाला आहे. कोरोनाची पहिली लाट ओसारल्यासारखे झाल्यानंतर थोड्याच काळानंतर देशात दुसरी लाट आली. महाराष्ट्रात परिस्थिती खूप वाईट झाली होती म्हणून कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यभरात लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लावला होता.

ब्रेक द चेन नावाने महाराष्ट्र सरकारने या कालावधीत काय सुरू राहणार व काय बंद राहणार याषयीचे सर्व नियम जाहीर केले होते त्यात इ-कॉमर्स कंपन्यांनी केवळ दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या उत्पादकांचीच विक्री करावी व घरपोच सेवा द्यावी असे निर्णय केले असता फ्लिपकार्ट या मोठ्या इ-कॉमर्स कंपनीने अत्यावश्यक नसणारी उत्पादके त्यांच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवले होते.

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड सूरज बाळासाहेब चकोर यांनी फ्लिपकार्ट ला कायदेशीर नोटीस पाठवून महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन या आदेशात कोणकोणते निर्बंध लावले आहेत हे दाखवून दिलं. विशेषतः इ-कॉमर्स कंपन्यांनी आपापल्या वेबसाईटवर काय काय विक्रीसाठी उपलब्ध ठेवू शकतात याची आठवण करू दिली व नोटिसद्वारे फ्लिपकार्ट ने सदरील महाराष्ट्र सरकरने जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे उत्पादक वेबसाईटवरून हटवण्याचे आवाहन दिले असता फ्लिपकार्ट कडून याची देखल घेऊन ‘ती’ अनावश्यक उत्पादके आता उपलब्ध नाहीत असे दर्शविले आहे. अॅड सूरज चकोर यांचे हे यश आहे, त्यांच्या नोटिसमुळेच फ्लिपकार्टला माघार घ्यावी लागली आहे.

सुरज चकोर यांनी फ्लिपकार्टला बजावलेली नोटीस वाचण्यासाठी खालील फाईल डाऊनलोड करा