मुंबई उच्च न्यायालयाने BEST कर्मचाऱ्याच्या कोविडकाळातील मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाईसह अनुकंपा नोकरीचे आदेश

37

न्यायालयाने यापूर्वीच्या ‘मायुरी कृष्णा जबरे विरुद्ध BEST’ या प्रकरणातील डिव्हिजन बेंचच्या निकालाचा संदर्भ घेत ‘प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटी’ (प्रमाणांशिक संभाव्यता) हा निकष लागू केला. कोविडची क्लासिक लक्षणे, सहव्याधी आणि हॉस्पिटल नोंदी लक्षात घेता मृत्यू कोविडमुळे झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार BEST चा २३ नोव्हेंबर २०२१ चा नकारात्मक आदेश रद्द करत खंडपीठाने खालील आदेश दिले:

याचिकाकर्त्या सुबोध लोकेश्री यांना प्रशासकीय आदेश क्र. ४०७/२०२० अंतर्गत त्वरित अनुकंपा नोकरी देण्यात यावी.• स्व. नयन लोकेश्री यांच्या वारसांना विभागीय अधिसूचना दिनांक १० जून २०२० नुसार ५० लाख रुपये (रु. ५०,००,०००/-) सानुग्र अनुदान (एक्स-ग्रेशिया भरपाई) देण्यात यावे.• दोन्ही बाबींची अंमलबजावणी प्रमाणित प्रति प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत करावी.या निकालामुळे कोविडकाळात कर्तव्यदक्ष राहून प्राण गमावलेल्या BEST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. याचिकाकर्ते सुबोध लोकेश्री यांनी या न्यायालयीन लढाईत यश मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई, २५ मार्च २०२६: मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती आर. आय. चगला व न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना) दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशात ब्रिहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (BEST) कर्मचारी स्व. नयन वसंत लोकेश्री यांचा कोविडकाळात सेवेत असताना झालेल्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश BEST ला दिले आहेत.याचिकाकर्ता सुबोध नयन लोकेश्री यांनी सानुग्र अनुदान आणि नोकरी मिळावी म्हणून Adv. विवेक ठाकरे Adv. सूरज चकोर आणि जागृती निंबाळकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील माधवी तवानंदी यांनी युक्तिवाद केला.सन २०२० च्या कोविड महामारीच्या काळात BEST चे बस कंडक्टर असलेले स्व. नयन लोकेश्री हे २७ वर्षांहून अधिक काळ सेवेत होते. त्यांचा ४ जून २०२० रोजी सेवेत असताना मृत्यू झाला. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या मेडिकल प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण ‘मायोकार्डियल इन्फार्क्शन’ आणि ‘सस्पेक्टेड कोविड-१९’ असे नमूद होते. तरीही BEST ने कोविड कारणीभूत ठरलेला मृत्यू असल्याचे पुरावा नसल्याचे सांगत अनुकंपा नोकरी व ५० लाख रुपयांच्या सानुग्र अनुदानाची मागणी फेटाळली होती.

Adv Suraj B ChakorAdvocate for Petitioner 9763543434