हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रींना पकडले

35

मुंबईत सेक्स रॅकेट चा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बेली डांसर आणि दोन टीव्ही मालिकेतील आभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आलं आहे. फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये दहा लाखांचा सौदा करत असतांना मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी वेषांतर करून गोरेगाव मधील 5 स्टार हॉटेल मध्ये सापळा रचला आणि सदरील रॅकेटचा पर्दाफाश केला. आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदरील हॉटेलमध्ये देहव्यापार, सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ त्यावर सापळा चारल्याने हे रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांच्या टीमला हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं. पोलिसांची टीम मुलींचा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भेटणार होती. सगळं ठरल्याप्रमाणे घडलं. 10 लाखांचा सौदाही पक्का झाला आणि त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात देहव्यापर करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलं आहे. यामध्ये राखी सावंतची मैत्रिण सापडल्यानं चित्रपट सृष्टीत मोठी खळबळ उडाल्याची माहिती मिळाली आहे.