राज्यात काल ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % झाला आहे.
आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.
राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
एकूण कोरोना रुग्णांची घट पाहता, ही बाब महाराष्ट्रासाठी सुखद असल्याचं पाहायला मिळतं आहे.