माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने असे का म्हणाले ?

117

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर ते आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत फरक पडलेला नाही.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे सूतोवाच केले आहे. सोबतच डॉ. तात्याराव लहाने यांनीही धनंजय मुंडे यांच्याबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो, अशा शब्दात डॉ.तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान देऊन गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. लहाने यांनी गेल्या सरकारमध्ये आपल्याला मोठा त्रास झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तर धनंजय मुंडेंनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली अस देखील तात्याराव लहाने म्हणाले आहेत.